Mumbai Crime News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : पैसे मागितल्याच्या रागातून बांबूने बेदम मारहाण, पीडित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai News : रघुनाथ फुलरम आरकवंशी असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : नोकराने मालकाकडे पैसे उधार मागितल्याने नोकरास मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाणाीत नोकराचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील वाकोला पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

मारहाणीनंतर नोकराला महापालिकेच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या भावाने मृत व्यक्तीच्या मुलास धमकी दिल्याचा प्रकारही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील रहिवासी रघुनाथ फुलरम आरकवंशी (53 वर्ष) ही व्यक्ती मुंबईच्या वाकोला परिसरात बोरवेल दुरुस्तीचे काम करत असे. यातून मिळणारी कमाई तो कलिना येथील एम.के. चिकन शॉप मालकाकडे देत असे.

मात्र मागील अनेक दिवसापासून काम न मिळाल्यामुळे रघुनाथ आरकवंशी याने चिकन शॉप मालकाकडे काही रक्कम मागितली. मात्र चिकन शॉप मालकाने पैसे न देता तेथे उपस्थित असलेल्या दोन जणांसोबत मिळून रघुनाथ आरकवंशी याला बांबूने मारहाण केली.

या मारहाणीत रघुनाथ गंभीर जखमी झाले यानंतर पोटात दुखू लागल्यामुळे भाभा रुग्णालयात उपचारासाठी गेले. मात्र डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सायन रुग्णालय येथे जाण्यास सांगितले. सायन रुग्णालयात उपचारादरम्यान रघुनाथ आरकवनशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मात्र आता या प्रकरणी तक्रार देऊ नये यासाठी मारहाण करणाऱ्या चिकन शॉप मालकाच्या भावाने मृताच्या मुलास धमकी दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. मात्र वाकोला पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला. (Latest Marathi News)

काही दिवसांनी सायन रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी आयपीसी 304 अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र आता या प्रकरणी पोलिसांनी कायद्यानुसार आयपीसी 302 ची कारवाई करायला हवी होती. पण पोलीस हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप मृताच्या मुलाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

SCROLL FOR NEXT