plane  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने विमानात सिगारेट ओढली, नेमकं काय घडलं?

Pune Delhi flights : सिगारेट ओढणाऱ्या त्या तरुणाच्या विरोधात पुण्यात विमातळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Pune Delhi flights : पुणे विमानातळावर काही दिवसापूर्वी बनावट तिकाटावरन हाणामारी झाली होती. आता दिल्ली-पुणे विमानात चक्क एका प्रवाशाने सिगाराट ओढल्याचा प्रकार समोर आलाय. सिगारेट ओढणाऱ्या त्या तरुणाच्या विरोधात पुण्यात विमातळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

प्रतीक पावले असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विमानात सिगारेट पिणाऱ्या तरुणाचे नाव नक्षब जहांगीर (वय ३८, रा. ओखला विहार नवी दिल्ली, सध्या रा. बाणेर) असे आहे. इंडिगो एअरलाइन्स विमानात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक हे इंडिगो एअरलाईनमध्ये सिक्युरिटी एक्सिक्युटिव्ह आहेत. ९ सप्टेंबरच्या रात्री जहांगीर हे इंडिगोच्या विमानाने दिल्ली ते पुणे प्रवास करत होते. यावेळी विमान हवेत असताना सूचना देवूनही त्यांनी निष्काळजीपणे बाथरूमध्ये जावून सिगारेट ओढली. अखेर विमान पुण्यात उतरल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्या

सुरक्षेच्या कारणास्तव विमानातून ज्वलनशील पदार्थ नेण्यास आणि सिगारेट ओढण्यास बंदी आहे. याची माहिती असतानाही प्रवाशी जहांगीर याने विमान हवेत असताना स्वच्छतागृहात जाऊन सिगारेट ओढली. त्याच्यावर आता विमान अधिनियम १९३७ च्या कलम ३७ नुसार आणि भारतीय न्यायसंहितेच्या १२५ कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Calculation: तुमचा पगार ₹५०,००० आहे? रिटायरमेंटनंतर मिळतील ५.५ कोटी, कसं? कॅल्क्युलेशन वाचा

Kande Poha Recipe: घरच्या घरी मऊ आणि मोकळे कांदा पोहे कसे बनवायचे? सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

Amitabh Bachchan: 'एक-एक करून सगळे...'; अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

Silent Heart Attack Warning: सायलेंट हार्ट अटॅक ओळखा! झटका येण्यापूर्वी शरीरात होऊ लागतात हे बदल

SCROLL FOR NEXT