malekar bullock cart for sant tukaram maharaj palkhai sohala  Saam Digital
मुंबई/पुणे

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा : तब्बल 12 वर्षानंतर मळेकरांच्या नंद्या- संद्या बैलजोडीला मिळाला मान

malekar bullock cart for sant tukaram maharaj palkhai sohala : या पालखी रथ ओढण्याची आणि सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या हिरा व राजा आणि नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या मल्हार व गुलाब या बैलजोडीला मान मिळाला आहे.

दिलीप कांबळे

जगद्‌गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या 375 व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपुर ते देहू या वेळी चौघडा गाडीसाठी टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या आणि संद्या या बैलजोडीला मान मिळाला आहे. गेले बारा वर्ष मळेकर कुटुंब दरवर्षी संस्थांनडे अर्ज करीत होते. यंदा पालखी सोहळ्यामध्ये चौघडा वादक गाडीचा मान मळेकर कुटुंबियांना मिळाला आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आलेला असताना श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने परीक्षण करून हा निर्णय घेतला आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी 26 बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकिय दृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून दोन बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी पालखी सोहळ्याच्या पुढे चालणाऱ्या चौघडा गाडीसाठी शोध घेऊन त्यांची निवड केली आहे.

यामध्ये बैलांचे पाय, खुर, शिंगे शेपटी, डोळे. यांचे परीक्षण महत्त्वाचं असतं. या वर्षी पालखी सोहळा प्रमुख व श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांनी बैलजोडीची परीक्षण केले होते.

आम्ही या बैलांची मुलाप्रमाणे निगा रागतो. मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे खुराक दिल्या जाते. बिट, ओला चारा, कुट्टी, यासारखे शक्तीवर्धक पदार्थ खाऊ घालतो. प्रॅक्टिस म्हणून बैलगाडीला जोडले जाते, शेतात औतालाही जोडले जाते. महत्त्वाचं म्हणजे ही बैल जोडी बारा तास चालण्यासाठी सक्षम कशी होईल याकडे लक्ष दिले जाते. दरम्यान चिखलीच्या मळेकर कुटुंबांना चौघडा वादक बैल जोडीचा मान मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon bahya Exit Poll : दादा भुसे गड राखणार की हिरे पुन्हा वर्चस्व मिळवणार? VIDEO

Sindkheda Exit Poll: पवारांचा करिष्मा चालणार का? सिंदखेडाची जनता कोणाला निवडणार? पाहा Exit Poll

Exit Poll : धीरज देशमुख पुन्हा आमदार होणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Exit Poll: धामणगाव मतदारसंघातून विरेंद्र जगताप होणार आमदार? पाहा Exit Poll

Nevasa Exit Poll: नेवासा मतदारसंघात कोण होणार आमदार? Exit पोलचा अंदाज काय

SCROLL FOR NEXT