Malad Property Dispute Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईच्या धो-धो पावसात गोळीबाराचा थरार, प्रॉपर्टीच्या वादातून मित्रानेच मित्रावर झाडल्या गोळ्या

Malad Property Dispute: मालाड पूर्वेत गोळीबाराचा प्रकार. प्रॉपर्टी वाद गोळीबारात रुपांतरित झाला. मित्रानेच मित्रावर गोळ्या झाडल्या. पोलिसांकडून गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • मालाड पूर्वेत गोळीबाराचा थरार.

  • मित्रानेच मित्रावर झाडल्या गोळ्या.

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल.

मुंबईतील मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालाड पूर्वेतील पठाणवाडीत गोळीबाराचा प्रकार घडला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून मित्राने मित्रावर गोळीबार केला आहे. एक ते दोन राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

गोळीबाराच्या घटनेमुळे मालाड पूर्वेतील पठाणवाडीत भयंकर घटना घडली. दोन मित्रांमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून भांडण सुरू होते. एकानं पिस्तूल काढली. तसेच गोळीबार केला. एक ते दोन राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई पूर्व उपनगरात पावसाचा थैमान

मुंबई पूर्व उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. एलबीएस मार्गावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. प्रवाशांना वाहतूकीदरम्यान, नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. एकच मार्गिका सुरू असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे प्रकरणात हायकोर्टात सुनावणीला सुरुवात

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

Happy Patel: आमिर खानच्या 'हॅपी पटेल'मधून डीके बोसची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; इमरान खान करणार कमबॅक? पाहा ट्रेलर

Fitness Mistakes: दररोज १०००० पावलं चालताय, पण रिझल्ट झिरो! संशोधनातून ही ५ कारणं आली समोर

Maharashtra Politics: आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा|VIDEO

SCROLL FOR NEXT