Temple Darshan Rules saam tv
मुंबई/पुणे

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

Temple Darshan Rules: तुळजाभवानी मंदिरात दर्शन व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. व्हीआयपी आणि सशुल्क दर्शन मार्ग बंद करून सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शनाची सुविधा देण्यात आली असून भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून आता सर्व भाविकांना समान अंतरावरून देवीचे दर्शन घेता येणार आहे. यापूर्वी २०० आणि ५०० रुपयांचे व्हिआयपी पास घेणाऱ्या भाविकांना आई तुळजाभवानीचे जवळून दर्शन दिलं जात होतं. त्यामुळे अनेक तास रांगेत उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

मात्र आता नव्या व्यवस्थेनुसार विशेष आणि सशुल्क दर्शनासाठी असलेले स्वतंत्र मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व भाविकांना एकाच पद्धतीने आणि समान अंतरावरून दर्शन घेता येणार आहे. या निर्णयाचे सर्वसामान्य भाविकांकडून स्वागत करण्यात येतंय.

मंदिर संस्थानच्या माहितीनुसार, दर्शनासाठी कोणालाही प्राधान्य दिलं जाणार नाही. सर्व भाविकांना एकाच रांगेतून दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. नव्या व्यवस्थेमुळे दर्शन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि भाविकांना कमी वेळेत तसेच अधिक सुलभ पद्धतीने तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसंच देणगी किंवा शुल्काच्या माध्यमातून होणाऱ्या दर्शनाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलं.

कोल्हापूरातील अंबाबाईचं दर्शन काही तास राहणार बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दर्शन व्यवस्था काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार नाही. अमित शहा हे शनिवारी सकाळी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार असून मंदिर संवर्धन आणि विकासकामांचा आढावा घेणार आहेत. विकास आराखड्याअंतर्गत प्रदक्षिणा मार्ग तसेच राम मंदिर जतन आणि संवर्धन कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वच्छता आणि इतर तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून परिसरातील बांधकाम साहित्य हटवण्यात आलंय. त्याचप्रमाणे मंडप, फेरीवाले आणि फूल विक्रेत्यांचे स्टॉलही काढण्यात आलेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव मंदिर परिसरातील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने देवस्थान समितीला दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT