Pune Traffic News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांना दिलासा! चाकण, शिरूर, रावेत, नऱ्हे, हडपसर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, उन्नत मार्ग अन्... ; काय आहे नेमका प्लान?

Pune Traffic News : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रावेत–नऱ्हे उन्नत महामार्गासह चार महत्त्वाच्या मार्गांच्या उन्नतीसाठी एनएचएआय आणि एमएसआयडीसीमध्ये करार झाला आहे. या प्रकल्पांमुळे आयटी व औद्योगिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • रावेत–नऱ्हे ६ पदरी उन्नत मार्गाचा तांत्रिक अभ्यास सुरू

  • पुण्यातील ४ महत्त्वाच्या मार्गांसाठी संयुक्त विकासाची तयारी

  • आयटी व औद्योगिक वाहतुकीला थेट आणि जलद पर्यायी मार्ग

  • शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास सुरळीत होण्यास मदत

  • दैनंदिन १.५ लाख वाहनांच्या दबावाला मिळणार उतारा

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्गासह चार महत्त्वाच्या मार्गांच्या उन्नतीसाठी एनएचएआय आणि एमएसआयडीसीमध्ये करार करण्यात आला आहे. या कराराचा पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह, हिंजवडी आयटीपार्क, चाकण औद्योगिक वसाहत आणि उपगनगरांना मोठा फायदा होणार आहे.

‘एनएचएआय’ने रावेत ते नऱ्हे या २५ किलोमीटर लांबीच्या उन्नत महामार्गाचा तांत्रिक अभ्यास सुरू केला आहे. त्याबरोबर पुणे ते शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वाच्या मार्गांची क्षमता, वाढ आणि उन्नत मार्गांचे ‘MSIDC’मार्फत नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी ‘NHI’ने एकत्रित विकासकामे करण्यासाठी हा करार केला आहे, असे NHI कडून स्पष्ट करण्यात आले.

रावेत-नऱ्हे आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हे शहरातील महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असून, या मार्गांवरून दैनंदिन सरासरी १.५ लाखांहून अधिक वाहने ये-जा करतात. चिंचवड, निगडी, आकुर्डी, थेरगाव, वाकड, हिनजवडी आणि नऱ्हे या परिसरात वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे हा उन्नत मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. जमिनीपासून १० ते १२ मीटर उंचीवरून सरळमार्गे अवजड आणि शहराबाहेर पडण्यासाठी इच्छुक वाहनांना मार्ग मिळाली, तर त्याखालील मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, असे NHI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, ‘रावेत ते नऱ्हे हा ६ पदरी उन्नत मार्ग सुमारे ४० ते ४५ किमी लांबीचा असेल. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच इतर तीन मार्गांसाठी ‘MSIDC’बरोबर करार करण्यात आला आहे. पुणे-शिरूर आणि चाकण-शिक्रापूर हा औद्योगिक परिसर असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची नेहमी ये जा असते. हडपसर-यवत मार्गावरून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहने अधिक आहेत. त्यामुळे बारामती-फलटण या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरही वाहतूक कोंडीचा ताण पडत आहे. त्यामुळे या चारही प्रकल्पांचा एकत्रित विकास झाल्यास शहराच्या वाहतुकीत मुलभूत बदल होईल.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar : विरार इमारत दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई, पालिकेच्या बड्या अधिकाऱ्याला अटक; १७ जणांचा झाला होता मृत्यू

Spicy suranchi bhaji: मार्गशीर्षमध्ये बनवा झणझणीत सुरणाची भाजी; नॉन-व्हेजची चवही विसराल

सेxxx रॅक्टचा पर्दाफाश, भाजप महिला नेत्यावर आरोप, संतप्त होत सांगितलं तो फ्लॅट नेमका कुणाचा?

Mrunal Thakur: "ऐ सुंदरी सुंदरी तुझं नाव काय गं"

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस आर्थिक गुन्हे शाखा शीतल तेजवानीच्या घराची झडती घेणार

SCROLL FOR NEXT