Badlapur Major Accident News  SAAM TV
मुंबई/पुणे

Badlapur Major Accident : मुलीला १०वीच्या परीक्षेला सोडायला चाललं होतं दाम्पत्य; कारनं उडवले; बाईकचे २ तुकडेच पडले

Badlapur Major Accident News : बदलापूरमध्ये भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने दुचाकीला उडवले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अजय दुधाणे, बदलापूर

Badlapur Major Accident News : बदलापूरमध्ये भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने दुचाकीला उडवले. मुलीला दहावीच्या परीक्षेला सोडण्यासाठी आई-वडील दुचाकीवरून चालले होते. त्याचवेळी ही भयंकर घटना घडली.

बदलापूर येथे हा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, कारच्या धडकेमुळे दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडेच झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमधील रेल्वे स्थानकानजीकच्या नगरपालिकेच्या कार्यालयाजवळील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने दुचाकीला उडवले. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

हे दाम्पत्य आपल्या मुलीला दहावीच्या परीक्षेला सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी हा अपघात घडला. कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले आहेत.

अपघातानंतर कार फुटपाथवर चढली

हा अपघात इतका भीषण होता की, कार थेट पुलावरील फुटपाथच्या भागावर चढली. तर या कारच्या खाली दुचाकीचा काही भाग अडकला होता. तर कारच्या मागच्या बाजूला दुचाकीचा टायर वेगळा होऊन पडला होता.

या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अपघातानंतर काही वेळातच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कार बाजूला घेण्यात आली. या अपघातात कारचेही नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त जनजाती गौरव वर्ष साजरा करण्यात येणार

हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार! नॉन व्हेज बिर्याणी दिल्यामुळे तरुणाची सटकली, रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली अन्...

दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसेच्या कार्यक्रमाला शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी, सूचक विधान करत म्हणाले...VIDEO

भीषण अपघात; एका सेकंदात स्कुटीचा चक्काचूर, भयानक अपघाताची घटना CCTV मध्ये कैद |Video Viral

SCROLL FOR NEXT