Pune-Ahmednagar Road Accident
Pune-Ahmednagar Road Accident Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

रोहिदास गाडगे

Pune-Ahmednagar Road Accident : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन जवळ एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे अपघातस्थळी मदतीसाठी येणाऱ्या भरधाव रुग्णवाहिकेने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील व्यक्ती सुद्धा जीवास मुकला. (Latest Marathi News)

तर, रुग्णवाहिकेचा चालक आणि त्याशेजारील बसलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात (Accident) होत आहे. हा महामार्ग मृत्युचा सापळा बनत चालला आहे.

आज (27 जानेवारी) दुपारच्या सुमारास कोरेगाव भिमा येथील वाडा पुनर्वसन फाट्यावरील छञपती ऑटो गॅरेज समोर येथे भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीस्वार महेश राजाराम गव्हाणे याचा जागीच मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

अपघातात कारचालक शंकरसन श्रीनरहरी राऊत (रा.लोहगाव पुणे) हे देखील जखमी झाले. या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांसह रुग्णवाहिकेला दिली. दरम्यान, अपघातस्थळी मदतीसाठी येत असलेल्या भरधाव रुग्णवाहिकेने कल्पेश वनज काटयाजवळ एका दुचाकीस्वाराला धडक दिली.

या धडकेत दुचाकीस्वार श्रीकांत सुर्यकांत उबाळे (वय २६ वर्ष ,रा.ढेरंगेवस्ती कोरेगाव भिमा) याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक देऊन रुग्णवाहिका उलटल्याने चालक आणि त्याच्याशेजारील व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी महेश गव्हाणे यांच्या अपघाताबाबत संतोष काळुराम गव्हाणे यांनी फिर्याद दिली असून श्रीकांत उबाळे यांच्या अपघाताबाबत प्रशांत सूर्यकांत उबाळे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Cereals: डाळ खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Tanvi Mundle : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Nana Patole On Opposition | एकेएक सगळेच विषय, नाना पटोलेंचा घणाघात!

Foods for Skin and Weightloss: रात्री 'या' फळांचे सेवन केल्यास त्वचेसोबत वजन राहिल नियंत्रणात

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT