Wadala Accident News Today: Car Parking Lift Tower Collapsed in Mumbai's Wadala Area Saam Tv
मुंबई/पुणे

Wadala Tower Collapsed: मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना, वडाळ्यात पार्किंग लिफ्ट कोसळली; अनेक कार अडकल्या

Mumbai Rain News Today: मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. वडाळा बरकत अली नगर येथे कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने ही दुर्घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन गाड

मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. वडाळा बरकत अली नगर येथे कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने ही दुर्घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये ही कार पार्किंग लिफ्ट पडतानाची दृश्य कैद झाली आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा येथील बरकत अली नगर येथे ही कार पार्किंग लिस्ट कोसळली आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात खालून जाणाऱ्या वाहनांवर ही पार्कींग लिस्ट कोसळल्याचे दिसत आहे. या वाहनांमध्ये काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत सध्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. याच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या येथे बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. तसेच टॉवरखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

रस्त्याच्या मधोमध हा टॉवर कोसळल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस येथूल वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, याठिकणी कोणी अडकलं आहे का, कोणी जखमी झाले आहे का, या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रस्त्यावरून ही लिस्ट हटवल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळू शकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात बदल; आजपासून काय काय बदललं?

Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

SCROLL FOR NEXT