Eknath Shinde during a meeting amid Mahayuti seat-sharing talks for Mumbai civic elections. saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

Mumbai Civic Polls: मुंबईतील जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी झाली आहे. भाजपने सेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र शिंदेसेनेला अधिक जागा हव्या आहेत. त्याशिवाय मराठी बहुल भागांवर शिंदेसेनेचा दावा आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपावरून तणाव.

  • भाजपने शिंदेसेनेला फक्त 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती.

  • मराठी बहुल भागांवर शिंदेसेनेचा ठाम दावा.

महायुतीसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्ष जास्त जागांसाठी आग्रही असल्यानं जागावाटपावरुन तिढा आहे. भाजपला 227 जागांपैकी किमान 150 ते 175 जागा लढवायच्या आहेत तर शिंदेसेनेलाही जागावाटपात सन्मानपूर्वक वाटा हवा आहे.मराठी बहुल भागातल्या जागांवरही त्यांचा दावा आहे. मात्र यासंदर्भात झालेल्या बैठकीत भाजपाने शिंदेसेनेला अवघ्या 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.

या जागांवर भाजप, शिंदेसेनेचा दावा

लालबाग

परळ

दादर

माहीम

भायखळा

कुलाबा

या भागामध्ये शिवसेनेची पारंपरिक ताकद असल्याचा शिंदेसेनेचा दावा आहे. संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक संपर्काच्या जोरावर त्या जागा आपल्यालाच मिळायला हव्यात, अशी भूमिका शिंदेसेनेची आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर बसेल असा दावा महायुतीचे नेते वारंवार करत असले तरी जागावाटपावरून मात्र रस्सीखेच होण्याची शक्यताच जास्त दिसतेय. 2017 साली मुंबईत शिवसेनेचे 84, भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील 47 नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या जागांवरही शिंदे सेना आग्रही आहे.

गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह अन्य वॉर्डातही भाजप आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीत पेच आहे. मुंबईतील शिंदेसेनेने मागितलेल्या जागांवर हिंदुत्ववादी मतांच्या जोरावर भाजपही हक्क सांगत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील काही मतदारसंघांत भाजपची ताकद वाढली आहे. शहरी मतदार, व्यापारी वर्ग आणि मध्यमवर्गीय भागांमध्ये भाजपचा प्रभाव वाढल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. महायुतीमधील जागावाटपाची ही कोंडी कशी फुटणार? एकनाथ शिंदे नमते घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT