Sakal Media Group Survey 2025 Saam tv
मुंबई/पुणे

Sakal Media Group Survey : वार्षिक परीक्षेत महायुती सरकार उत्तीर्ण; कायदा व सुव्यवस्थेच्या पेपरला किती गुण मिळाले?

Sakal Media Group Survey 2025 : वार्षिक परीक्षेत महायुती सरकार उत्तीर्ण झाल्याचे सकाळ माध्यम समूहाच्या सर्व्हेतून समोर आलंय. या राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार वर्षभरात किती यशस्वी ठरलं, जाणून घ्या.

Vishal Gangurde

महायुती सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहेत

राज्यात कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा झाल्याचं सर्वेक्षणातून समोर

सर्वेक्षणातून महायुती सरकारच्या तीन प्रमुख नेत्यांच्या कार्याचा ठसा उमटल्याचे दिसतंय

महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुती सरकार सत्तेवर येण्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. महायुती सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महायुती सरकारने एक वर्षाच्या कारभारात महत्वाचे निर्णय घेतले. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा'ने सर्व्हे केला. या सर्व्हेतील कायदा व सुव्यवस्थेच्या पेपरमध्ये महायुती सरकार उत्तीर्ण झालं.

महायुती सरकारच्या मागील १ वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न ‘सकाळ माध्यम समूहा’ने सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नागरिकांना विचारला. हा प्रश्न विचारल्यानंतर लोकांना तीन पर्याय देण्यात आले होते.

२०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३४ जागा जिंकल्या होत्या. त्यातील भाजपने १३२ जागांवर विजय मिळवला. पुढे राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रि‍पदासह गृह विभागाचा कारभार देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे घेतला. गृह विभागाचा कारभार हातात घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस दलात महत्वाचे बदल करण्याचे आदेश दिले होते.

महायुतीचा १ वर्षांच्या कारभारानंतर घेतलेल्या सर्व्हेत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ‘सकाळ माध्यम समूहा’ने सर्वेक्षणातून जाणून घेतली. या सर्व्हेत महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनंतर कायदा व सुव्यवस्था सुधारल्याचे लोकांनी सांगितले. राज्यातील १६.१ टक्के लोकांना कायदा व सुव्यवस्थेची स्थिती खूप सुधारल्याचं वाटतंय. तर ५०.५ टक्के लोकांना ही स्थिती थोडी सुधारल्याचं वाटत आहे. मात्र, ३३.३ टक्के लोकांना बिघडल्याचं वाटतंय. महायुती सरकारच्या वर्षभराच्या काळात त्यांच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटविल्याचे सर्व्हेतून दिसतेय.

कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वर्षभरात किती सुधारली?

खूप सुधारली - १६.१ टक्के

थोडी सुधारली - ५०.५ टक्के

बिघडली - ३३.३ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT