Mahayuti Loksabha Election 2023  Saam TV
मुंबई/पुणे

Loksabha Election 2024 : निवडणुकीआधीच महायुतीत बिनसणार?; मावळ लोकसभेच्या जागेवरुन तिन्ही पक्षात रस्सीखेच

Maharashtra Political News : श्रीरंग बारणे इच्छूक असताना देखील उर्से टोल नाका येथे भाजपचे बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फलक झळकले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाने देखील मावळ लोकसभेवर नुकताच दावा केला होता.

दिलीप कांबळे

Pune News :

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना राज्यात पाहायला मिळणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर दुसरीकडे महायुतीत काही जागांवरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्याच्या मावळमध्ये आगामी लोकसभेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण महायुतीतील तीनही पक्षांना मावळ मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे मावळमधून विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देखील तेच येथून इच्छुक आहेत. तशी त्यांनी इच्छा बोलून देखील दाखवलेली आहे. (Latest Marathi News)

मात्र श्रीरंग बारणे इच्छूक असताना देखील आता उर्से टोल नाका येथे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फलक झळकले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाने देखील मावळ लोकसभेवर नुकताच दावा केला होता. त्यामुळे महायुतीतच मावळ लोकसभेवरून वाद होण्याची चिन्ह आहेत.

तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मावळ लोकसभेवर दावा ठोकला आहे. बाळा भेगडे यांच्या भावी खासदाराच्या फलकामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे मात्र टेन्शन वाढल आहे. तर अजित पवार गटाच्या दाव्यात या टेन्शनमध्ये भरच पडली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा उमेदवारी कोणाला मिळणार हे आगामी काळच ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणच्या हल्ल्यात इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा मृत्यू? त्या व्हिडिओनंतर जगभरात खळबळ; नेमकं काय आहे सत्य?

Pune Crime: इफ्तार पार्टीदरम्यान रक्तरंजित थरार, तरुणांवर कोयत्याने सपासप वार; ५ जण गंभीर जखमी, पुण्यात खळबळ

Viral Video: शाळेच्या कार्यक्रमातील मुलींचा 'टॉवेल डान्स' व्हायरल; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Pune : हुंड्यासाठी छळ! पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी, लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यातच मृत्युला कवटाळले

IPL 2026 : आयपीएलच्या १० संघांचे कॅप्टन ठरले, तुमच्या फेव्हरिट टीमचा कर्णधार कोण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT