Uddhav Thackeray Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mahavikas Aghadi News : जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणे महत्वाचे; उद्धव ठाकरे यांची भूमिका : सूत्र

Mahavikas Aghadi seat Sharing News :जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणे महत्वाचे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे.

प्रविण वाकचौरे

सुनील काळे

Political News :

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मात्र जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणे महत्त्वाचे आहे, असं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षश्रेंष्ठींना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

जागावाटपावरुन सुरु असलेल्या चर्चांवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जागावाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. भाजपविरोधात एकत्रित लढायचं आहे. जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणे महत्वाचे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची आधीच युती झाली आहे. आता प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा देखील सुरु असून लवकर ते महाविकास आघाडीत सामील होतील, असं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे.

मात्र प्रकाश आंबेडकरांच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला बिघडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला सांगितलं जात असलं तरी त्यात प्रत्येक पक्ष‌ जागांची जोरदार मागणी करताना दिसत आहे.

कोणत्या पक्षांची किती जागांची मागणी?

  • काँग्रेसची २२ जागांची ‌मागणी.

  • शिवसेनेची २३ जागांची‌ मागणी.

  • राष्ट्रवादी शरद पवार गटाची १० ते ११ जागांची‌ मागणी.

  • प्रकाश आंबेडकर यांनी सर्व पक्षांना समान १२-१२-१२-१२ जागांचा फॉर्म्युला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

मोठी बातमी! अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर क्राइम ब्रांचची कारवाई

Sleeveless Blouse Designs:स्लीव्हलेस ब्लाऊज कोणत्या साडीवर परफेक्ट दिसतो? स्टायलिश राहण्यासाठी या टिप्स करा फॉलो

निवडणुकीचं मैदान मारलं, पण नियतीने हरवलं; राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Black Blouse Design: काळ्या साडीवर खुलून दिसेल तुमचा तोरा! हे आहेत 5 युनिक ब्लाऊज पॅटर्न

SCROLL FOR NEXT