Devendra Fadnvis Saam Tv
मुंबई/पुणे

यह तो झांकी है....; महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपचे 'हे' ट्विट व्हायरल

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळले. यामुळे आता भाजप (BJP) आणि शिंद गट एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल भाजपच्या ट्विटर हॅन्डलवरुन एक सूचक ट्विट करण्यात आले आहे.

काही महिन्यात राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका (Election) होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचीही निवडणूक काही महिन्यात होणार आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजीनामा दिला. यानंतर भाजपने काल आनंदोत्सव साजरा केला. या पार्श्वभूमीवर काल मुंबई भाजपच्या (BJP) ट्विटर हॅन्डलवरुन एक ट्विट केले आहे. 'यह तो झांकी है.... मुंबई महापालिका अभी बाकी है...!' असं ट्विट केले आहे.

काही महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे, महापालिकेवर भाजपला एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.

भाजप आणि शिंदे गट एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना तर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटातील 'या' नेत्यांना मिळणार मंत्रिपदी बढती

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले होते. या बंडात महाविकास आघाडीमध्ये मंत्री असणारे नेत्यांनीही बंड केले होते, यात शिवसेना (ShivSena) नेते शंभूराजे देसाई यांनीही बंड केले होते. आणि अपक्ष असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही बंड केले होते. या दोन्ही मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

SCROLL FOR NEXT