Police investigate the TET paper leak case in Bhiwandi after the Maharashtra exam was cancelled due to a major breach. saam tv
मुंबई/पुणे

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

TET Paper Leak: नीट पेपरफुटीनतर आता राज्यात TET परीक्षेचाही पेपरही फुटलाय... मात्र या फुटीचं कनेक्शन परराज्य़ात कसं पोहचलयं... 28 जूनची TET परिक्षा रद्द करण्याची नामुष्की परीक्षा परिषदेवर कशी ओढावलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

नीट पेपरफुटीनंतर देशात एकच वाद पेटलेला असताना आता TET परिक्षेचा पेपरही फुटलाय.. परिक्षेच्या एक दिवस आधी झालेल्या या पेपरफुटीमुळे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेनं 28 जूनचा पेपर रद्द केलाय... परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिलीय.

परीक्षेच्या एक दिवस आधीच भिवंडीत हा टीईटीचा पेपर फोडण्यात आला. पोलिसांना हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे तातडीनं परीक्षा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र नेमका हा पेपर फुटल्याचं कसं लक्षात आलं ते पाहूयात...

कसा फुटला TETचा पेपर?

27 जूनला पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची भिवंडीत धाड

- तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावलं

- पडताळणीनंतर TETच्या पेपरमधील काही प्रश्न सारखे असल्याचं आढळलं

- भिंवडी पोलिसांनी पेपर जप्त करून तीन आरोपींना अटक केली ...

- एक आरोपी हरियाणातील तर दोन आरोपी बिहारचे आहेत

- दिल्लीतून पेपर घेऊन भिंवडीत विक्रीसाठी आल्याचा संशय

- एका आरोपीनं केंद्रीय विद्यालयात नोकरीसाठी इतर आरोपीला पैसे दिल्याची माहिती

- पेपर फुटल्याचं लक्षात आल्यानंतर 28 जूनची TETपरीक्षा पुढे ढकलली

28 जूनला राज्यातील तब्बल 1028 केंद्रांवर TET परिक्षा होणार होती... त्यासाठी 6 लाख 126 परिक्षार्थींनी नोंदणी केली होती... मात्र 28 जूनला होणारी परीक्षा रद्द झाल्यानं लोखा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला असून त्यांच्या पदरी निराशा आलीय... विरोधक आक्रमक झाले आहेत. पेपरफुटीमध्ये सरकारचाच सहभाग असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय.... तर दुसरीकडे वारंवार पेपरफुटी का होते, दोषींना कायद्याचा धाक राहिलेला नाही का? असा सवाल आमदार विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय...नीट परीक्षेतील गैरप्रकार डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुरक्षेचे मोठे दावे केले होते. पण, परीक्षा सुरू व्हायच्या 24 तास आधीच झालेल्या पेपरफुटीमुळे यंत्रणेचे धिंडवडे निघालेत...'पारदर्शक कारभारा'च्या घोषणा देणाऱ्या सरकारला पेपरफुटीचे हे सत्र का रोखता येत नाही? 3 जणांना जरी अटक झाली असली तरी या रॅकेटची पाळेमुळे परराज्यात असल्यामुळे त्याची किती खोलवर चौकशी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT