Maharashtra Board Results 2023 Date Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

Maharashtra Board Results 2023 Date: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दहावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारपर्यंत जाहीर होणार आहे.

Satish Daud

Maharashtra SSC Result 2023: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे २ जून २०२३ रोजी जाहीर होणार आहे. 

बोर्डाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.  (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Exam) पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. (Breaking Marathi News)

दरम्यान, परीक्षेनंतर दहावीचा निकाल (SSC Result) कधी लागणार? याची प्रतिक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली असून उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे.

दहावी परीक्षेचा निकाल कसा पाहायचा?

दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागले. येथे विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.

निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर येणारं बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

Panchang Today: आज कुंभ राशीत चंद्र, निर्णयांसाठी अनुकूल दिवस; पाहा आजचे मुहूर्त आणि लकी राशी

SCROLL FOR NEXT