Shubham jadhav  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra SSC result 2022 : पुण्याच्या पठ्ठ्याची कमाल;सर्वच विषयात ३५ गुण

पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्याने (Pune) दहावीच्या बोर्डात सर्व विषयात ३५ गुण मिळवण्याची कमाल करणाऱ्या विद्यार्थ्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील निकाल - ९६.९४ % इतका लागला. यंदा कोकण (Koknan) विभागाची बाजी तर नाशिक (Nashik) विभाग सर्वात शेवटी असल्याचं समोर आलं आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.२७% तर नाशिक विभागाचा निकाल ९५.९०% इतका लागला आहे. दरम्यान, पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्याने (Pune) दहावीच्या बोर्डात सर्व विषयात ३५ गुण मिळवण्याची कमाल करणाऱ्या विद्यार्थ्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. ( Maharashtra SSC result 2022 Latest News updates In marathi)

दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याठी विद्यार्थी-विद्यार्थिनी खूप मेहनत घेतात. या मेहनतीच्या जीवावर अनेक विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवतात. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक विषयाचा कसून अभ्यास करतात. ९० किंवा ९९ टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून भरपूर कौतुक होतं. याच विद्यार्थ्यांवर अभिनंदनांचा वर्षाव होतो. मात्र, दुसरीकडे पुण्यातल्या गंजपेठेतील राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण या पठ्ठ्याने दहावी बोर्डात सर्वच विषयात ३५ गुण मिळविण्याचा प्रताप केला आहे.

सर्वच विषयात मिळवले 35 गुण

पुण्यातल्या गंजपेठेमध्ये राहणाऱ्या शुभम जाधव या विद्यार्थ्याने दहावीच्या बोर्डात सर्व विषयात ३५ गुण मिळवण्याचा प्रताप केला आहे .तो रमनबाग शाळेत शिकत होता.शुभम जाधव हा गंजपेठेमध्ये वास्तव्यास आहे. शुभम हा भवानी पेठेतील एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला देखील जातो. तर आई वडील देखील मोलमजुरी करतात. शुभमला पुढे जाऊन पोलिस बनायचं आहे, त्यासाठी कॉमर्सला प्रवेश घ्यायचा आहे. काम करता करता दहावीच्या परीक्षेत ३५ टक्के मिळवूनही शुभमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

SCROLL FOR NEXT