मुंबई/पुणे

Rain in Maharashtra: ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस! बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांची उडाली धांदल, पुढील ४८ तासांत राज्यातील हवामान कसं असेल?

maharashtra unseasonal rains : हवामान विभागाने पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Vishal Gangurde

Pune rain update:

ऐन दिवाळीत राज्यातील काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईसह आजूबाजूच्या भागात पाऊस बरसला. त्यानंतर आज शुक्रवारी देखील लोणावळ्यात पाऊस पडला. यामुळे दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं. तर हवामान विभागाने पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर या भागात काल पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर अचानक आलेल्या पावसामुळे रेल्वेचाही वेग मंदावल्याचे दिसून आले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागातही पाऊस कोसळत आहे. तर पुढील ४८ तासांत या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे आंबाच्या पिकांचे नुकसान झालं आहे.

लोणावळ्यात अवकाळी पावसाची हजेरी

दरम्यान, आज शुक्रवारी लोणावळ्यात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने लोणावळ्यात दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली.

दिवाळीनिमित्त लोणावळा शहरातील बाजारपेठ सजली आहे. त्यामुळे बाजारात गर्दी आहे. पण अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात नागरिकांची धांदल उडाली. तर मावळात दोन दिवसांपासून पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.

पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

अवकाळी पावसामुळे दक्षिण-मध्य महाराष्ट्रात ओलावा कायम आहे. तर आज शुक्रवारी गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातही हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा रत्नागिरीमध्ये मूक मोर्चा

Police Suspended: ९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात खळबळ

23 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; CM कार्यालयात मोठे फेरबदल, कोणाची कुठे नियुक्ती?

Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT