Mumbai Rain Today  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Update: मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोल्हापुरात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

राज्यात कालपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात काल (मंगळवार) पासून मुसळधार पावसाने (Rain) सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशातील सर्वच राज्यांत मान्सून सक्रीय झाला आहे. ५, ८ आणि ९ जुलै रोजी तेलंगणातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज सकाळी मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण नवी मुंबईत सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच एनडीआरएफच्या देन तुकड्या कोल्हापुरात (Kolhapur) दाखल झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्यच्या पश्चिम भागात पावसाने (Rain) चांगलाच जोर धरला आहे. तापोळा येथे तीन नद्यांचा संगम आहे. कोयना,सोळशी,कांदाटी या तिन्ही नद्या या ठिकाणी मिळतात या भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे दरे, गाढवली आणि इतर गावातील लोकांना आता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

कोयना धरण क्षेत्रात सुद्धा पावसाने जोर धरल्याने या भागातील कोयना धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सद्या झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

कोकणात काही ठिकाणी दरड कोसळली आहे, तर चिपळूनमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव आणि सडक-अर्जुनी परिसरात मुसळधार पाऊस (Rain) पडला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिरोडा तालुक्यात १४० मिमी आणि गोरेगाव तालुक्यात १०६ व गोंदिया तालुक्यात ८१ .४ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT