Maharashtra Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Maharashtra Rain Update:

राज्यात गेल्या ८ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके करपू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी राजा मोठ्या आतुरतेने पावासाची वाट पाहू लागला आहे. मात्र ही परिस्थिती असताना राज्यात ऑगस्टच्या उर्वरित दिवसांमध्ये पाऊस नसून सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. (Latest Marathi News)

हवामाने विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात एल निनोचा प्रभाव पाहयला मिळेल. त्याचा परिणाम सप्टेंबरमध्ये काय होईल, हे पाहावं लागेल. तसेच राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पुढील १० दिवस शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पेरण्या जूनच्या अखेरीस झाल्या. कारण जूनमध्ये अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. अनेक शेतकऱ्यांची पिके वर आली आहेत. मात्र, पिकांना पाणी मिळत नाहीये. या पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आवाहन आहे की, काही भागात हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस असण्याची शक्यता आहे. मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याची स्वत:हून शेततळे किंवा इतर माध्यमातून नियोजन करावं'.

'जुलैमध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसला. ऑगस्टमध्ये पाऊस कमी प्रमाणात पडला. गेल्या २० दिवसांमध्ये राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही. विदर्भ आणि कोकणात चांगला अर्थात सरासरी पाऊस आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

'राज्यात सात टक्के तुटीचा पाऊस. त्याचबरोबर पुढील दहा दिवस पावसाचे कोणत्याही प्रकारचे तीव्र इशारे नाहीत. पुढील आठ-दहा दिवस मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीच्या काळात पावसाची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 25 टक्क्यांनी कमी पाऊस पडला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Maharashtra Live News Update : पुणे तिथे काय उणे..पुण्याच्या करवंदे काकांनी सिंहगड किल्ला केला १ हजार ७०६ वेळा सर

Diwali 2025: दिवाळीत मातीचेच दिवे का लावतात? त्याचे फायदे काय?

Saree Dress Design: आईच्या जुन्या साड्यांपासून तयार करा 'हे' ट्रेंडी ड्रेस; कोणत्याही सणांसाठी आहे कम्फर्टेबल आणि बेस्ट

Prem Birhade : लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT