maharashtra rain update
maharashtra rain update Saam Tv
मुंबई/पुणे

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! राज्यात येत्या ५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवासांपासून मान्सूनच्या (Monsoon) आगमनाची शेतकरी वाट पाहत आहेत. या वर्षी मान्सून वेळेअगोदर राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता, पण अजुनही राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली नव्हती. आता येत्या पाच दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणात गुरूवार(१६ जून) आणि शुक्रवारी सलग दोन दिवस मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. (Monsoon Latest Update)

आज सकाळपासून विदर्भातील ११ जिल्ह्यात पावसाला (Rain) सुरूवात झाली आहे. विदर्भात मान्सून दाखल झाल्याची माहिती नागपूर (Nagpur) हवामान विभागाने दिली आहे. कालपासून विदर्भात ढगाळ वातावरण झाले होते, आज पावसाला सुरूवात झाली आहे. तर येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra rain Latest News)

अरबी समुद्रात मान्सून सक्रीय होण्यास पोषक वातावरण झाले आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण झाल्यास येत्या दोन दिवसात कोकणातील बहुतांश भागात पावसाला (Rain) सुरूवात होणार आहे. आज सकाळपासूनच काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणी पाऊस सुरू झाला. मान्सूनसाठी आणखी पोषक वातावरण तयार झाल्यास मान्सून येत्या ४८ तासात मान्सून कोकणात आगेकुच करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जून महिन्याची १६ तारीख आली तरीही अजून पावसाला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी अजुनही खरीपाची पेरणी केलेली नाही. शेकतऱ्यांनी शेती तयार करुन ठेवली आहे, पण पावसाअभावी पेरणीची कामे थांबलेली आहेत. आता येत्या चार दिवसात पावसाला सुरूवात झाल्यास पेरणीला सुरुवात होईल, पण संपूर्ण पावसाला सुरूवात झाल्याशिवाय पेरणी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विदर्भात मान्सून दाखल

विदर्भातील ११ जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाला (Rain) सुरूवात झाली आहे. कालपासून विदर्भात ढगाळ वातावरण झाले होते, आज पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भात मान्सून दाखल झाल्याची माहिती नागपूर (Nagpur) हवामान विभागाने दिली आहे. यामुळे विदर्भातील शेतकरी आता सुखावला आहे. विदर्भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: तिढा कायम! नाशिकचा उमेदवार जाहीर करण्यावरुन महायुतीच्या दिग्गज नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

Maharashtra Election: कुठून आला इतका पैसा ? दादरमध्ये १.१४ कोटींची रोकड जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

Karmaveer Bhaurao Patil Biopic : कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन रुपेरी पडद्यावर पाहता येणार, 'कर्मवीरायण' चे पोस्टर रिलीज

Lok Sabha Election : इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्याना करता आले नाही मतदान; ईडीसी प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याचा आरोप

APMC Vegetables Price News | भाज्यांची आवक घटली, दर वधारले!

SCROLL FOR NEXT