Maharashtra Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Alert: राज्यातील काही भागात विजांसह पाऊस कोसळणार; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तास विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Weather Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात मान्सूसपूर्व कोसळत आहे. तर काही ठिकाणी नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. अशातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तास विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (Latest Marathi News)

हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस अपेक्षित केली आहे. राज्यातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर , बीड, छ. संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड , बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, मुंबई, रायगड अशा भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. या भागात पुढील तीन तास पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये आज मान्सून पूर्व पावसाने हजेरी (Rain Update) लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि जोरदार तशी 30 ते 40 च्या वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज मान्सून विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी सकाळपासूनच नभ दाटून आले असून नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली असून शेतात काढून ठेवलेल्या पिकांवर आवरण घालण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून आली.

दरम्यान, नाशिक सोबतच धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने (Monsoon Update) हजेरी लावली. धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावताच भले मोठे झाड उन्‍मळून पडले. या खाली उभ्‍या असलेल्‍या कारवर झाड पडल्‍याने गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

Shoe Bite Remedy: नवीन बूट घातल्यानंतर पायाला चावतात का? 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

SCROLL FOR NEXT