mahayuti  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Maharashtra Political News : अगदी काही दिवसांपूर्वीच अमित शहा मुंबईचा दौरा केला होता. यावेळी महायुतीतील जागावाटपावर खलबतं झाली होती. आता पुन्हा एकदा शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

Satish Daud

विधानसभा निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईचा दौरा केला होता. यावेळी महायुतीतील जागावाटपावर खलबतं झाली होती. आता पुन्हा एकदा अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी अमित शाह महाराष्ट्रात येणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशीही शाह संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत देखील अमित शहांची बैठक होणार आहे.

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा लवकर सुटला नाही. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळच मिळाला नाही. परिणामी अनेक जागांवर पराभव पत्कारावा लागला, असं महायुतीतील (Mahayuti Seat Sharing) प्रमुख नेत्यांचं म्हणणं आहे. आगामी विधानसभेत मात्र ही चूक आपण टाळायला हवी यावर देखील तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे.

यामुळेच महायुतीत जागावाटपावरून बैठकांचा धडाका सुरु आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच बैठकीत जागावाटपाला अंतिम रुप दिले जाईल. दरम्यान, जागावाटपाचा फॉर्म्यूला पितृपक्षात जाहीर करायचा की नवरात्रात हे देखील याच बैठकीत ठरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे २३ सप्टेंबर रोजी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत भाजपची ६० ते ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. आगामी विधानसभेत भाजप १५० ते १६० जागा लढवण्यास इच्छुक असून शिवसेना शिंदे आणि अजित पवार गटाला समसमान जागा मिळू शकतात, अशी माहिती देखील खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

SCROLL FOR NEXT