राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावरून आता विरोधक अमित शाह यांच्यावर टीक करत आहे. अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण होणे ही त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाची विडंबना आहे, असा घणाघात ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. 'अमित शाह यांनी अजितदादाचं जगणं मुश्लिक केलं होतं असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'अमित शाह किती दिवसांनी अवतीर्ण झाले? झेन-झीचे आंदोलन सुरू असताना कुठे होते? चकाट्या पिटणाऱ्या गृहमंत्र्यांनी हे बोलू नये. अजितदादा असताना त्यांच्यावर आरोप केले. त्याच अजितदादांच्या स्मारकचं लोकार्पण काल त्यांनी केले. अजितदादा हयातीत असताना आरोप केले आणि काल त्यांनी नाक रगडलं.'
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'देशातील कोरोना काळात, देशात सर्वोत्तम मुख्यमंत्री मी नाही त्या संतांनी सांगितलं. निर्बुध माणसासमोर मी काही फार बोलत नाही. मणिपूर किंवा इतर ठिकाणी, अरुणाचलमध्ये ज्या घटना घडत आहेत तिथे गृहमंत्र्याने जायला हवं. पण चकत्या पीटणाऱ्या माणसाने बोलू नये. अमित शहांनी मध्यरात्री किंवा केव्हाही जाऊन अजितदादांच्या पुतळ्याला नाक घासून माफी मागायला हवी.'
संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका करत गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अजित पवार हे देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली आणि मानसिक धक्क्यात होते. तसेच या लोकांनी अजित पवार यांची माफी मागायला हवी होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी मोठी मोहीम चालवली होती. भ्रष्टाचारी अजित पवार, ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अशा आरोपांचा सातत्याने प्रचार करण्यात आला. त्यांना वारंवार घाबरवून आणि दबाव टाकून शरद पवार यांचा पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.