Eknath Shinde Group MP Bhavana Gawali Saam TV
मुंबई/पुणे

Bhavana Gawali News: भावना गवळींना घेरण्यासाठी ठाकरेंनी आखला मोठा प्लान; शिंदे गटाला धक्का बसणार?

Eknath Shinde Group MP Bhavana Gawali: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भावना गवळी यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Yavatmal - Washim Loksabha: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांना घेरण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनिती आखली जात आहे. (Latest Marathi News)

अशातच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांनी तयारी सुरू केली असून येत्या ११ तारखेला त्यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये कार्यकर्ता हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. (Maharashtra Political News)

दिग्रस मतदार संघातून संजय देशमुख आमदार होते, त्यांनी 2002 ते 2004 या काळात मंत्रीपद भूषवलं होतं. काँग्रेसमध्ये असताना संजय देशमुख यांनी आता शिंदे गटात असणाऱ्या संजय राठोड यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सुरुवातीला ते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात ते निवडणूक लढतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र त्यांनी दिग्रसच्या बाहेर पडून बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. आता भावना गवळी यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

संजय देशमुख यांच्यासह पोहरा देवी गडाचे महंत सुनील महाराज हे देखील भावना गवळी यांच्याविरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. स्वतः सुनील महाराजांनी इच्छा व्यक्त केली आहे.

भावना गवळी यांच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव साहेबांनी (Uddhav Thackeray) आदेश दिला, तर मी नक्की लढेन, असं महंत सुनील महाराज यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या अनुषंगाने आज वाशिममध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी शिवसैनिकांना मेळाव्यालाही उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT