Baramati Loksabha Election
Baramati Loksabha Election Saamtv
मुंबई/पुणे

Baramati Politics: बारामतीत सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता; भावी खासदार म्हणून बॅनर झळकल्यानंतर रंगल्या चर्चा

मंगेश कचरे

Baramati Loksabha Election 2024:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत होणार की काय? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरुद्ध कोण लढणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपासून सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात होते. अशातच आता सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स झळकल्याने त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

बारामती लोणंद रोडवर सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून लागलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत असतानाच हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा प्रचाररथही फिरू लागला आहे, त्यामुळेच सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणाच बाकी असल्याचेही बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

Special Report | शिंदेंना भाजपचा मुख्यमंत्री म्हणून विरोध! राऊतांच्या दाव्याने राजकीय भूकंप येणार?

SCROLL FOR NEXT