Sharad Pawar Maharashtra Vidhan Sabha News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधासभेसाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; मुंबईत 'इतक्या' जागा लढवणार, महाराष्ट्र पिंजून काढणार

Sharad Pawar Maharashtra Vidhan Sabha News : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी मास्टर प्लान आखला असून मुंबईत सर्वाधिक जागा लढवण्याची तयारी केली आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज राष्ट्रवादीकडून मुंबईमधील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने मुंबईत विधानसभेच्या एकूण ६ जागा लढवल्या होत्या. यावर्षी त्याहून अधिक जागा लढवणाचा त्यांचा मानस आहे.

यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा, अणुशक्ती नगर, कुर्ला, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजी नगर-मानखुर्द या विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहे.

पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघाचा रिपोर्ट सादर केला जाणार आहे. राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आलेल्या या काही विधानसभेमध्ये सध्या महाविकास आघाडी मधील विद्यमान आमदार आहेत.

दुसरीकडे शरद पवार देखील विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मैदानात उतरणार आहेत. लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १०० जागा लढवण्याचा मानस आहे. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची निश्चिती होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या प्रत्येक पक्षाचा जागा निश्चित झाल्या की शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. विधानसभेत काँग्रेस १०० ते १०५ जागा, शिवसेना ठाकरे गट ९० ते ९५ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ८० ते ८५ जागा लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. अर्थातच अधिकृत जागाबाबत सध्या कुठल्याही नेत्यांनी अद्याप भाष्य केलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : राजकारणात खळबळ! मुख्यमंत्र्यांना ३ तास दिल्ली एअरपोर्टवर थांबवलं; ५० हजारांचा दंड घेतल्याचा आरोप

Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Weak Heart Symptoms: ही १० लक्षणे सांगतील तुमचे हृदय कमजोर झाले आहे: चुकूनही करू नका दुर्लक्ष!

Sleep Mistakes : गाढ झोप झाली तरी सकाळी उठल्यावर डोकं का भणभणतंय? 'या' ५ गंभीर चुका ठरू शकतात कारणीभूत

Maharashtra News Live Update: ठाण्यातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT