Rohit Pawar Filed Defamation Case Against Gulabrao Patil Saatv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मोठी बातमी! रोहित पवारांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Rohit Pawar Filed Defamation Case Against Gulabrao Patil: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे|ता. २९ जानेवारी २०२४

Pune Breaking News:

राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. ईडी चौकशी प्रकरणी खोटे व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात रोहित पवार यांच्याकडून १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. रोहीत पवार यांची ईडी चौकशीनंतर गुलाबराव पाटील यांनी डल्ला मारला असेल, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. तसेच गल्ला जर मारला असेल, डल्ला खाल्ला असेल तर चौकशीला जावेच लागेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.

या चौकशीनंतर कोणी खोटे कींवा चुकीचे आरोप केले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुणे न्यायालयात रोहित पवार यांच्याकडून गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१२ तास ईडी चौकशी, पवारांचे शक्तीप्रदर्शन...

दरम्यान, २५ जानेवारी रोजी रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालय परिसरात हजेरी लावत जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT