विक्रम काकडे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
उमेदवारीमुळे पक्षातील काही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
पुण्यासाठी विधान परिषदेच्याबाबत महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती. राष्ट्रवादीकडून अनेक नावांची चर्चा पुण्यातून समोर येत होती. ही जागा नेमकी कोणाला मिळणं अशी चर्चा असतानाच संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थित आज संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेल्या विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या उमेदवारीसाठी खासदार पार्थ पवार यांनी विशेष प्रयत्न केले, ज्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत इच्छुक नाराज झाले आहेत अशी चर्चा आहे.
विक्रम काकडे हे पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत. संजय काकडे हे भाजप चे माजी खासदार (राज्यसभा) राहिलेले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ते अनेक नगरसेवकांसाठी "किंगमेकर" ठरले होते. पुणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून राहत असल्यामुळे काकडे यांचं सगळ्याच राजकीय पक्षाशी चांगले संबंध राहिले आहेत.
भाजपमध्ये असल्यापासून त्यांचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री, खासदार आणि आमदारांशी संपर्क होता तसेच पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असल्यामुळे त्यांची अजित पवारांशी सुद्धा चांगली जवळीक होती. पुढे राजकीय वारसा कायम राहाव म्हणून आता त्यांनी जबाबदारी पुत्र विक्रम काकडे यांच्यावर दिली आहे असं समजतं.
विक्रम काकडे हे 'विक्रम काकडे कन्स्ट्रक्शन' या कंपनीचे संचालक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. तसेच काकडे हे स्टेट शुटींग चॅम्पियन राहिले असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे.
सुनील टिंगरे यांचे आजोबा बाळासाहेब टिंगरे हे पुणे जिल्ह्याच्या धानोरी गावचे सरपंच होते. त्यामुळे स्वाभाविक कारणामुळे टिंगरे यांचा राजकारणाशी. जुना संबंध आहे. सुनील टिंगरे हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. 2007 मध्ये वडगाव शेरीतून महापालिकेच्या निवडणुकीचे तिकीट दिले. आणि सुनील टिंगरे प्रथमच नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत पोहोचले. स्थानिक लोकांशी असलेले संबंध, सामाजिक कार्यात सक्रिय राहणे त्यांच्या स्वभावात असल्यामुळे आणि अजित दादांची मिळालेली साथ यामुळे ते वडगाव शेरी चे आमदार झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.