Raj Thackeray Amit Shah News Saamtv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं नवीन खात उघडलं...' मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अमित शहांना टोला

Raj Thackeray Thane News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज (गुरूवारी) ठाणे शहराच्या दौऱ्यावर आहेत.

Gangappa Pujari

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

Raj Thackeray Press Conference Today:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज (गुरूवारी) ठाणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी अमित शहा यांच्या मोफत राम मंदिर दर्शन घडवण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. 'भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं नवीन खात उघडलं आहे..' अशी टीका त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे (BJP) सरकार आल्यास रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले होते. शहांच्या या वक्तव्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीका केली आहे. भाजपने टूर्स एन्ड ट्रॅव्हल्सचं नवं खातं उघडलं असावं.. असा टोला त्यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीवरही टीका...

यावेळी बोलताना मनसे अध्यक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. स्वतःची जात प्रत्येकाला प्रिय असते. मात्र दुसऱ्यांच्या जातीचा द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाले, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली. याचा धोका म्हणजे राज्याचा मध्यप्रदेश, बिहार व्हायला वेळ लागनार नाही.. असेही ते यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगेच्या पाठीशी कोण?

यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन मोठे विधान केले आहे. अशाप्रकारे कोणतेही आरक्षण मिळणार नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरू आहे. हे इतके सरळ चित्र दिसत नाही. मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) पाठीशी कोण आहे? हे लवकरच स्पष्ट होईल असे ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT