Murlidhar Mohol Social Post On Maharashtra CM Saam Tv
मुंबई/पुणे

भाजप पुन्हा धक्कातंत्र अवलंबणार ते मुख्यमंत्रिपदाची चर्चा; अखेर मुरलीधर मोहोळ यांनी मौन सोडलं

Murlidhar Mohol Social Post On Maharashtra CM: एकीकडे मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपमधील आणखी एका नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप पुन्हा धक्कातंत्र अवलंबणार की काय असं देखील म्हटलं जात आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ९ दिवस झाले तरी देखील सत्ता स्थापनेबाबतचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सध्या चर्चांवर चर्चा सुरू आहेत. दिल्लीमध्ये देखील अमित शहा बैठका घेत आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींकडून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचे सांगितले जात आहे.

एकीकडे मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपमधील आणखी एका नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. मुरलीधर मोहोळ हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळू शकते अशा सुरू होत्या. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपमध्ये त्यांच्या नावाबाबत कोणतीही चर्चा नव्हती किंवा पक्षश्रेष्ठींकडून देखील त्यांच्या नावाबाबत काहीच चर्चा झाली नाही. तरी देखील ते राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. पण आता त्या चर्चेचं मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत खंडन केले आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.'

मुरलीधर मोहोळ यांनी या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

SCROLL FOR NEXT