batmi magchi batmi Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार? महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Political News : महायुतीच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांनी सत्तेस्थापनेसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री कोण होणार,याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत काही आमदार शपथविधी घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेस्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या काही नेत्यांनी दिल्लीत ठाण मांडलं आहे. आज मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या दोन दिवसांत शपथविधी सोहळा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसोबत इतरही पक्षाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत काही आमदार शपथविधी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजपचे पाच ते सात आमदार आहेत. त्यात अजित पवार गटातील पाच आमदार असणार आहेत. तर शिंदे गटातील पाच आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीला रवाना होणार आहेत. आज दिवसभरात सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. अंतिम चर्चा अजित पवार यांचासोबत झाल्यानंतर आता दोन्ही नेते दिल्लीला रवाना होणार आहेत. सध्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल दिल्लीत ठाण मांडून आहेत.

दिल्ली दौऱ्यानंतरच मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. दिल्लीत वरिष्ठांची बैठक झाल्यानंतर नाव जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी २९ तारखेला होण्याची शक्यता आहे. आधी तीन जणांचे शपथविधी होतील. त्यानंतर इतर मंत्र्यांचे शपथविधी होणार आहेत.

तसेच अडचणी निर्माण होतील, अशा कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना सर्व सूचना महायुतीच्या आमदारांना देण्यात आल्या आहेत. विजय आणि जल्लोषाचा भरात वादग्रस्त गोष्टी होतील असं काही बोलू नका, अशाही सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT