Parvati Vidhan Sabha Constituency  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ३ मिनिटांचा उशिर, उमेदवारी अर्ज मागे नाही; सुप्रिया सुळेंचा प्रयत्न अयशस्वी

Parvati Vidhan Sabha Constituency: उमेदवारी अर्ज मागे घेण्यास उशिर झाल्यामुळे पुण्यातील सचिन तावरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार आहे. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

Priya More

Maharashtra Vidhan Sabha: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली होती. या वेळेपूर्वी अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण पुण्यामध्ये एका उमेदवाराला ३ मिनिटं उशिर झाल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही. पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास उशिर झाल्यामुळे पुण्यातील सचिन तावरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी विनंती करून देखील त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन तावरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळेमध्ये ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यांना त्या ठिकाणी पोहचण्यासाठी ३ मिनिटांचा उशीर झाला. त्यामुळे त्यांचा अर्ज माघारी घेता आला नाही. त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार आहे. पण सचिन तावरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पाठिंबा दिला आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सचिन तावरे यांना निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहेत. त्यांना रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. रिक्षा चिन्हावर सचिन तावरे निवडणूक लढवणार आहेत. शेवटच्या क्षणी सचिन तावरे यांनी माघार घेतली नाही. कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे सचिन तावरेंनी स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी ३ वाजता समाप्त झाला. पुणे शहरात सध्या ३ बंडखोर उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. मनीष आनंद, कमल व्यवहारे, आबा बागुल हे तिन्ही उमेदवार काँग्रेसचेच आहेत. पुणे शहरात महाविकास आघाडीची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे. कसबा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांनी अर्ज मागे घेतला नाही. शिवाजीनगर मतदारसंघातून मनीष आनंद तर पर्वती मतदारसंघातून आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

Famous Singer Death : संगीत क्षेत्रातला अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

महागड्या क्रिम्स कशाला? चेहऱ्याचे काळे डाग आणि खाज घालवण्यासाठी कापूर ठरेल वरदान; पाहा वापरण्याची योग्य पद्धत!

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

SCROLL FOR NEXT