Nawab Malik And Daughter Sana Malik Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: वडिलांच्या मतदारसंघातून सना मलिक निवडणुकीच्या रिंगणात, नवाब मलिक कुठून लढणार?

Nawab Malik And Daughter Sana Malik: राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारीच सना मलिक यांना एबी फॅार्म पाठवण्यात आला होता. नवाब मलिकांना आज एबी फॅार्म देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक - शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारीच सना मलिक यांना एबी फॅार्म पाठवण्यात आला होता. नवाब मलिकांना आज एबी फॅार्म देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघाचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नेतृत्व केले आहे. मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिक - शेख यांच्यासाठी सोडला आहे. वडिलांनी बांधलेला हा अभेद्य गड पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी सना मलिक - शेख या गेली ५ वर्षे काम करत असल्याचे समजते.

नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर न डगमगता सना मलिक - शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाने आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात काम सुरूच ठेवले होते. आज त्याच मतदारसंघातून सना मलिक - शेख या आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT