Uddhav Thackeray Eknath Shinde News  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: लोकसभेपूर्वी शिंदे गटाला दुहेरी धक्का बसणार? आजी-माजी खासदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Thackeray vs Shinde: लोकसभेपूर्वी शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे गटाचे दोन आजी-माजी खासदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Satish Daud

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं, तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार तसेच खासदार त्यांच्यासोबत गेले. इतकंच नाही, तर नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेंच्या नेतृत्वाला पसंती दिली. इतक्या मोठ्या संख्येने आमदार, खासदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अचानक साथ सोडल्याने ठाकरे गटाला मोठी गळती लागली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, आता लोकसभेपूर्वी शिंदे गटाला (Eknath Shinde) दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे गटाचे दोन आजी-माजी खासदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील एक विद्यमान खासदार उद्धव ठाकरे आणि दुसरे माजी खासदार अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना सोडून गेलेले माजी आमदार तसेच नेत्यांना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहे. अशातच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात परतणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

त्यामागे कारणही तसंच आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी एका कार्यक्रमात बोलताना हेमंत गोडसे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केा आहे. ठाकरे गटात परतण्यासाठी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील शिंदेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. शिवाजीराव पाटील हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची मनापासून इच्छा असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

SCROLL FOR NEXT