Eknath Shinde on Raj Thackeray on Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली; एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा आरोप

Eknath Shinde on Raj Thackeray on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना मोठं विधान केलंय.

Satish Daud

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हा माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांशी आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता? याबाबत अजूनही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना मोठं विधान केलंय.

राज ठाकरे यांनी शिवसेना वाढीसाठी बाळासाहेबांच्या खाद्याला खांदा लावून काम केले. पण उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्यांना शिवसेनेतून बाहेर पडावे लागले, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज ठाकरेंनी पक्षातून जावं अशी मुळीच इच्छा बाळासाहेबांची नव्हती, असा खुलासा देखील शिंदेंनी केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकतीच एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. पण उद्धव ठाकरे म्हणतात, लाडका भाऊ कधी आणणार? आम्ही युवा प्रशिक्षणातून लाडका भाऊही आणला".

'उद्धव ठाकरेंमुळेच राज यांनी शिवसेना सोडली'

राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना शिंदे म्हणाले, "राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी शिवसेना सोडण्यामागे उद्धव ठाकरे आहे. राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पण जेव्हा त्यांच्याकडे जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मनात लालसा आली".

"उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी काही जणांना हाताशी धरुन स्वत:ला कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव आणला. त्यानंतर राज ठाकरे यांना हटवण्यात आले. मात्र, यानंतरही राज ठाकरेंनी ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे, तिथे मी काम करतो, असं म्हणत जबाबदारी मागितली. पण त्यांना ती दिली गेली नाही. यामुळेच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज ठाकरे महायुती का नाहीत?

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुती का नाहीत? असा प्रश्नही एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना शिंदे म्हणाले, "राज ठाकरे आमच्यासोबतच आहे. आम्ही एकत्र लढत नसलो तरी ते आमच्या विरोधात नाहीत. अजून निवडणुकीला वेळ आहे. ते सोबत आले तर त्यांना महायुतीत घेऊ", असंही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT