Eknath Shinde-Devendra Fadnavis SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: भाजपचे खरे टार्गेट मुख्यमंत्री शिंदेच, मनोज जरांगे फक्त निमित्त; काँग्रेसचा मोठा आरोप

Nana Potole News: मनोज जरांगे फक्त निमित्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच भाजपचे टार्गेट असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

Maharashtra Political News

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेनंतर भाजप आमदार आक्रमक झाले. मनोज जरांगे यांची वक्तव्ये आणि हिंसक आंदोलनाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदारांकडून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मागणीनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत खळबळजनक आरोप केला आहे. मनोज जरांगे फक्त निमित्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच भाजपचे टार्गेट असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (ता. २८) यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना पटोले म्हणाले, "महायुतीत जागा वाटपावरुन अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट केलंय". (Latest Marathi News)

"मनोज जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करत असताना मुख्यमंत्री शिंदे त्यांना जाऊन भेटले होते. त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक OSD सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त असून भाजपचे खरे टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देताच, ओबीसी नेते बबनराव तायवाडे जरांगे यांच्या मदतीसाठी धावले आहेत. जरांगे यांची वक्तव्य चुकीचे असून मी त्यांचा निषेधच केला आहे. पण शब्दप्रयोग एसआयटी चौकशी लावण्याइतके होते का? मी एसआयटीचे सुद्धा समर्थन करणार नाही, असं तायवाडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT