Suryakanta Patil Quits BJP: Saamtv
मुंबई/पुणे

Suryakanta Patil Join NCP: 'युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत...', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सूर्यकांता पाटील यांचा शरद पवारांना शब्द| VIDEO

Suryakanta Patil Quits BJP: नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. २५ जून २०२४

नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विधानसभेच्या तोंंडावर भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. सूर्यकांता पाटील यांनी आज एक महत्वाचा राजकीय निर्णय घेतला, त्यांच मी स्वागत करतो असे म्हणत शरद पवार यांनी यावेळी सूर्यकांता पाटील यांचे स्वागत केले.

शरद पवारांना दिला शब्द!

"माझ्या आयुष्याचा सर्वाधिक काळ साहेबांसोबत गेला. भविष्यातील लढाईसाठी मी तुमच्यासोबत आले आहे. देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले. या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे. परतीचे दोन मी स्वत: कापले आहे. मी कधीच घराबाहेर पडले नाही. माझ्या अंतापर्यंत मी आपल्यासोबत असेन," असा शब्द सूर्यकांता पाटील यांनी दिला.

तसेच "मी रागात निघून गेले होते. ज्यांच्याकडे गेले तोंड दाखवंल नाही. मी शेतात राबले. ज्या घरातले लेकर पळून जातात. त्यांच्या बापाला असंच काम कराव लागतं. ज्या घरात मी गेले. तिथल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला नाही. बर झालं नाही तर विश्वासघात झाला असता," असेही त्या यावेळी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पाणी वापरावर मर्यादा यावी यासाठी महापालिका आयुक्ताचा निर्णय

Khalid Ka Shivaji: 'खालिद का शिवाजी'ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठा धक्का; महाराष्ट्र सरकारने केली कारवाई

Raksha Bandhan 2025 : 'हम साथ साथ हैं' ते 'जिगरा'; लाडक्या बहिणीसाठी प्लान करा मूव्ही डेट

Swollen veins in hands: हाताच्या नसा फुगलेल्या दिसत असतील तर सावध व्हा; 'या' 6 आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता

ओला - उबर सोडा, आता सरकारी टॅक्सीतून फिरा, कमी दरात उत्तम सेवा; पहा कुठे अन् कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT