भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अलका केरकर यांचे निधन
माजी उपमहापौर आणि तीन वेळा नगरसेविका
लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
माजी उपमहापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. अलका केरकर यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्या वार्ड क्र. ९८ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
शनिवारी २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सांताक्रूझ पश्चिम येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्या दुपारी १२ वाजता सांताक्रूझमधील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
अलका केरकर या भाजपच्या अतिशय अनुभवी नगरसेविका होत्या. त्या सलग तीनवेळा मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकून आल्या होत्या. २०१२ पासून त्या मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. विशेष म्हणजे २०१४ ते २०१५ या काळात त्या मुंबई महापालिकेच्या उपमहापौर देखील होत्या. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत प्रशासकीय कामकाजांचा प्रदीर्घ अनुभव होता.
निवृत्त शिक्षिका असणाऱ्या अलका केरकर यांचा या वार्ड क्र. ९८मध्ये दांडगा जनसंपर्क होता. साधी राहणी, पक्षाला समर्पित आयुष्य आणि भ्रष्टाचार विरोधी, अनधिकृतेला कधीच थारा न देणाऱ्या अलका केरकर निष्कलंक आयुष्य जगल्या. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणाऱ्या अलका केरकर यांच्या निधनाने वांद्रे पश्चिम विभागाचे कधीच न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
गेली ३० वर्षे वांद्रे पश्चिम मधील जनतेची सेवा आणि भाजपाचे काम मोठ्या संघर्षाने आम्ही केले. त्या संघर्ष काळातील एक महत्त्वाचा शिलेदारच मी आज गमावला. त्याच्या जाण्याने वांद्रे पश्चिम हे आमचे एक मोठे कुटुंबच आज दु:खात बुडाले आहे, अशा भावना मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.