Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक नेते- पदाधिकारी भाजपच्या वाटेवर

Hitendra Thakur: हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला भाजपने मोठा झटका दिला आहे. बहुजन विकास आघाडीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी हितेंद्र ठाकूर यांची साथ सोडली. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary -

  • हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का.

  • माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह १४ नेते-पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश.

  • स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा होणार.

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता.

विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर बहुजन विकास आघाडी अद्याप सावरू शकलेली नाही. पक्षांतर्गत मतभेद वाढले असून एकापाठोपाठ एक नेते आणि पदाधिकारी हिंतेद्र ठाकूर यांची साथ सोडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हितेंद्र ठाकूर यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला रामराम ठोकला आहे.

हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीला भाजपच्या स्नेहा दुबे पंडीत यांनी पुन्हा धक्का दिला आहे. बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवकासह काही प्रमुख पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज हे सर्वजण भाजपाचे कमळ हाती घेणार आहेत. बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सरदार छोटू आनंद यांच्यासह विविध पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात पक्षप्रवेश होणार आहे.

१४ जण करणार भाजपमध्ये प्रवेश -

१. सरदार श्री. छोटू आनंद (माजी नगरसेवक) – बहुजन विकास आघाडी

२. श्री. राजू इस्साई (विभाग प्रमुख) – बहुजन विकास आघाडी

३. सरदार रविंदर सिंह आनंद – बहुजन विकास आघाडी

४. सरदार करणदीप सिंह अरोरा (माजी युवक काँग्रेस सरचिटणीस)

५. सरदार गुरजीत सिंह छाबरा (हॉटेल नीलम पंजाब)

६. सरदार गुरमीत सिंह छाबरा (हॉटेल नीलम पंजाब)

७. सरदार चरणजित सिंह सभरवाल

८. सरदार नरेंद्रपाल सिंह माखिजा

९. सरदार गुरजिंदर सिंह चावल (स्वागत केटरर्स)

१०. सरदार सुकदेव सिंह (माजी हवाईदल कर्मचारी)

११. सरदार भूपिंदर सिंह हंसपाल

१२. सरदार तरसिम सिंह

१३. सरदार गुरमीत सिंह छाबरा

१४. सरदार जस्मीत सिंह छाबरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकारणात पडद्यामागं मोठी घडामोड|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT