Navi Mumbai Shivsena News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश

Navi Mumbai Shivsena News : नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऐरोतील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Satish Daud

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिंदे पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरले असून त्यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऐरोतील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

मनोज हळदणकर यांनी ऐरोतील चांगली ताकद आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, अचानक हळणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करीत असून मी त्यांच्या कामापासून प्रेरित झालो आहे. आगामी काळात ऐरोलीत चांगल्या विकासकामांची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया ममोज हळदणकर यांनी दिली आहे.

भाजपचे १६ नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार?

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे तब्बल १६ नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीत आम्ही शिंदेंच्या शिवसेनेला मदत केली. मात्र, त्यांनी आमचे साधे आभारही मानले नाही. उलट आम्हीच महायुतीत मोठा भाऊ असल्याचं सांगत शिंदे सेना आम्हाला हिणवत आहेत, असा आरोप या नगरसेवकांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT