Ajit Pawar |Devendra Fadanvis Saamtv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: जॅकेटमध्ये गरम होत नाही का? अजित पवारांचा सवाल; देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल उत्तर, वाचा खास किस्सा

Ajit Pawar Visit Shirur Loksabha: "आपण कष्टाने, घाम गाळून पिकवलेला ऊस आहे. त्यात आपली फसवणूक होणार नाही, यासाठी काटा तपासात चला," असा सल्लाही अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

रोहिदास गाडगे

Ajit Pawar Speech:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज अजित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मांडवगण फराटा येथे अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीका करत जोरदार फटकेबाजी केली.

काय म्हणाले अजित पवार?

"मी शेतकरी आहे. त्यामुळं पोल्ट्री, फळबाग, भाजीपाला अशा प्रकारची शेती मी करतो. वेळ मिळेल तेव्हा मी शेतात जातो. मात्र कामाच्या व्यापाने मला तिथं जाता येत नाही. पण त्या अनुभवातून मला शेतकऱ्यांच्या समस्या समजलेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे," असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले

यावेळी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जॅकेटचा एक खास किस्साही सांगितला. 'भर उन्हात जॅकेट घालणारे मी पाहतो. एवढ्या उन्हात जॅकेट घालून गरम होत नाही का? असं मी अनेकांना विचारलं. अगदी देवेंद्र फडणवीस यांच्याशी ही याबाबत चर्चा केली. यावर काय नाय एकदा सवय लागली. काय होत नाही," असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"आपल्या भागात पिकवलेला ऊस आपल्याच कारखान्यात जावा, अशी अपेक्षा असते. आता तुमचा ऊस लगतच्या भागातील कारखान्यात जातोय. त्यांचा काटा चांगला आहे. मात्र ऊस देताना काटा नक्की चेक करा, बरेच कारखानदार काटा मारतात. आपण कष्टाने, घाम गाळून पिकवलेला ऊस आहे. त्यात आपली फसवणूक होणार नाही, यासाठी काटा तपासात चला," असा सल्लाही अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT