ncp crisis|Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजित पवारांनी आपल्याच आमदारांचा निधी रोखला? आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा

AJit Pawar NCP Mla News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते तसेच आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याने अजित पवार यांनी आपल्याच आमदारांचा निधी रोखून धरल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

Satish Daud

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. सध्या ते पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते तसेच आमदार हे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या संपर्कात असल्याने अजित पवार यांनी आपल्याच आमदारांचा निधी रोखून धरल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.कामांना मंजुरी मिळाल्यानंतर संबधित आमदारांनी पक्षबदल केल्यास त्यांना याचा राजकीय फायदा होऊ नये, यासाठी अजित पवार खबरदारी घेत असल्याचं कळतंय.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या नव्या धोरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांमध्ये मोटी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. तळ्यात-मळ्यात असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मतदारसंघातील विविध विकासकामे करण्यासाठी आमदार 'डीपीसी'च्या माध्यमातून निधीची मागणी करीत असतात.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांनी विविध कामांचे प्रस्ताव उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. त्यापैकी तब्बल 1256 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार पुन्हा शरद पवार गटाच्या परतीच्या वाटेवर आहे.

ही बाब अजित पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी आमदारांचा निधी रोखला असल्याची चर्चा आहे. संबंधित आमदारांना जर विकासकामांच्या निधीचे वाटप केले आणि त्यानंतर त्यांनी पक्षबदल केला तर त्यांना राजकीय फायदा होऊ शकतो, त्यामुळेच हा निधी रोखला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Lek Ladki Yojana: राज्य सरकारची योजना! लेक १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १ लाख १ हजार रुपये

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT