Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: महायुतीत अजित पवारांची एन्ट्री होताच लोकसभा जागा वाटपाचं गणित बिघडलं? शिंदे गटाला कोणता फॉर्म्युला हवाय?

Maharashtra Politics: राजकीय परिस्थितीनुसार महाराष्ट्रात सत्तेवरील तीन पक्षांमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य रंगू शकते.

सूरज सावंत

Maharastra Political News:

लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाने यासाठी लोकसभा मतदार संघात चाचपणी सुरू केली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार महाराष्ट्रात सत्तेवरील तीन पक्षांमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य रंगू शकते.

अजित पवारांना सोबत घेतल्यानंतरही शिवसेना शिंदे गट लोकसभा निवडणुकीला वाटाघाटी करायला तयार नाहीत. २०१९ च्या लोकसभेला लढलेल्या सगळ्या जागांवर शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे शिंदे-भाजप जुन्या फॉर्म्युला वरच जागा वाटप करणार का? हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. (Latest Marathi News)

शिंदे सरकारची वर्षपूर्ती होत नाही, तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची एन्ट्री सत्तेत झाली. अजित पवारांच्या एन्ट्रीने सत्तेतील इतर दोन्ही पक्षात 'कभी खुशी कभी गम' असा प्रकार सुरू आहे.

अजित पवारांना सत्तेत सहभागी होऊन तीन महिने झाले तरी पालकमंत्रिपद मिळत नव्हतं. त्यामुळे नाराज झालेल्या अजित पवारांना खूश करण्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री पदांचे वाटप करण्यात आले.

मात्र, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपाबाबत शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेत, मागच्या वर्षीच्याच फॉर्म्युल्यावर शिवसेना जागा लढवणार आहे. लोकसभेसाठी होत्या, त्या जागा तुम्ही लढवाव्यात हे सांगण्यात आल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

मागच्या वर्षीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना २२ तर भाजप २६ जागा लोकसभेला लढवल्या होत्या. यात शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला होता. तर ४ जागांवर पराभव झाला. मात्र आता शिवसेनेकडूनही लोकसभेच्या तयारीची सुरूवात करण्यात आली आहे.

शिवसनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मतदारसंघात पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभेच्या २२ जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केलं.

शिवसेना शिंदे गटाकडे सध्या १८ पैकी १३ खासदार आहेत, तर ठाकरे गटाकडे ५ खासदार आहेत. ठाकरे गटाकडे असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याचा निर्णय एकनाथ शिंदे लवकरच घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजप आणि शिवसेना यांनी २०१९ साली युतीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपनं २५ जागा लढवून २३ जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १८ जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या अनुक्रमे २५ आणि १९ जागा लढवल्या होत्या. तर चार जागांवर घटकपक्षाचे उमेदवार उभे होते.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची सत्तेत एन्ट्री झाल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटासमोर लोकसभा जागा वाटपांचं मोठं आवाहन आहे. त्यात शिवसेनेना मागच्याच फॉर्म्युल्यावर ठाम असल्याने युतीत अजित पवारांच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येतात, की जागावाटपावरून युतीत मिठाचा खडा पडतो हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT