Mahavikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत काँग्रेस-ठाकरे गट-शरद पवार गटात चर्चा; बैठकीत नेमकं काय झालं?

INDIA Alliance News : काँग्रेस आपल्या महाराष्ट्रातील मित्रपक्ष ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यापेक्षा जास्त जागा घेत आघाडीत सर्वात महत्वाचा पक्ष म्हणून स्थान घेण्याच्या प्रयत्नात आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची महाराष्ट्राच्या जागावाटपाबाबत पहिली बैठक पार पडली. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी कोण किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्याच्या नेत्यांमध्ये यावर बराच वेळ चर्चा झाली. (Latest Marathi News)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४८ पैकी २३ जागांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही मागणी अवास्तव असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने जागांबाबत आपली ठोस भूमिका मांडलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा भारत गटात समावेश करण्याची मागणी करण्याशिवाय या बैठकीत कोणतीही विशिष्ट मागणी केली नाही. जागावाटपाबाबतच्या पुढच्या फेरीत वाटाघाटीबाबत आणखी खेचाखेची होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे ४८ पैकी २६ जागांवर लक्ष असल्याचं समजतंय. काँग्रेस आपल्या महाराष्ट्रातील मित्रपक्ष ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यापेक्षा जास्त जागा घेत आघाडीत सर्वात महत्वाचा पक्ष म्हणून स्थान घेण्याच्या प्रयत्नात आहे.

पक्षातील फुटीमुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची बार्गेनिंक पावर कमी झाली आहे. आता पुढची चर्चेची फेरी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात १४-१५ जानेवारी दरम्यान जागावाटप बैठकीची पुढील फेरी होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur: बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, १० लाखांचा औषधसाठा जप्त; अनेक बडे मासे गळाला लागणार?

Maharashtra Live News Update: दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

GAIL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; पगार १.८० लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा कडुलिंबाची पेस्ट, करुन बघा घरगुती उपाय

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT