Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी? समोर आली मोठी अपडेट

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. आता राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसवर काय निर्णय येणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. (Breaking Marathi News)

ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानंतर हे सरकार पडेल, असे दावे केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासाठी आता फक्त चार ते पाच तारखा उरल्या आहेत. यामध्ये ८ ते १२ मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे. (Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. तर दुसरीकडे जवळपास २६ जून २०२२ पासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भातच्या प्रकरणावर सर्वोच न्यायालयात सुनावणी सुरु होती.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारी ते १६ मार्च सलग सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात तरी हा निकाल लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Political News)

राज्यातील सत्तासंघर्षावर याच आठवड्यात निकाल येण्याची शक्यता

ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे.

न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. १३ आणि १४ मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे ८ ते १२ याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT