Maharashtra Political Crisis Shahaji Bapu Patil viral Audio Clip 
मुंबई/पुणे

'काय झाडी...' ऑडिओ क्लिपमुळं चर्चेत आलेल्या शहाजी बापू पाटील यांचे 'या'बाबत स्पष्टीकरण

शहाजी बापू पाटील यांची त्यांच्या एका कार्यकर्त्यासोबत बोलतानाची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेतील जवळपास ४० आमदारांना घेऊन ते आसाममधील गुवाहाटीमध्ये गेले. शिंदेंसोबत (Eknath Shinde) असणाऱ्या य़ा सर्व आमदारांपैकी सोलापूर जिल्हा सांगोला येथील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेत आले आहेत.

आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांची त्यांच्या एका कार्यकर्त्यासोबत बोलतानाची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांने आमदारांना ते सध्या कोठे आहेत? असा प्रश्न विचारला असता, 'आपण सध्या गुहाटीत असून इथे काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओके हाय सगळं' असं आमदारांनी त्यांच्या सोलापूरी बोलीत केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर (Social Media) चांगलंच व्हायरल झालं. एवढेच काय त्यांच्या या वक्तव्यावरुन मीम्स आणि नवनवीन गाणी देखील आता तयार करण्यात येत आहेत.

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर (Facebook And Instagram) देखील 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल सगळं ओके हाय सगळं' असं कॅप्शन देऊन फोटो देखील टाकले जात आहेत. त्याला लोकांकडून प्रतिसाद देखील दिला जात आहे. याच शहाजी बापु पाटील यांनी आता आपल्या राजकीय भुमिकेबाबत एक स्पष्टीकरण दिलं आहे.

हे देखील पाहा -

माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला होता. आमचा विरोध हा महाविकास आघाडीला असून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलो असल्याचं स्पष्टीकरण सोलापूर जिल्हा सांगोला येथील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिलं आहे.

तसंच एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसून याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यासोबत सध्या ४० - ५० लोक इथं आले आहेत ते सर्व स्वखुशीनं आले असून आम्ही मुंबईला लवकरच येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितलं. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी गुहावाटीमध्ये असणाऱ्या काही आमदारांनी आपल्याशी संपर्क केल्याचा दावा केला होता. शिवाय तिथे काही आमदारांना बळजबरीने घेऊन गेले असल्याचं देखील राऊत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचं प्रत्युत्तर आता शिंदे आणि शहाजी बापु पाटील यांनी दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT