Raj Thackeray Meet Cm Eknath Shinde Saamtv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: प्रमुख नेत्यांसह राज ठाकरे 'वर्षा'वर दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट..

Raj Thackeray Meet Cm Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Political Crisis: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. २ दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि- मनसेची युती असल्याची चर्चा समोर येवू लागल्या होत्या. त्यानंतर आत्ता सर्वात मोठी बातमी समोर येत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.. (Maharashtra Political News)

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेही वर्षावर पोहोचले आहेत.

गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या घटना समोर येत होत्या. दोन दिवसांपासून मनसे- ठाकरे गट युती होणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चां रंगू लागल्या आहेत..

दरम्यान, अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शिंदे- फडणवीस सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातील राजकारण आता अधिकच अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे.आता ठाकरे- शिंदेंच्या भेटीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून यामागे काही नव्या राजकीय समिकरणांचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT