Eknath Shinde Devendra Fadnavis Latest News
Eknath Shinde Devendra Fadnavis Latest News SAAM TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde-Amol Mitkari | जे चालवलंय ते बरे नाही शिंदे साहेब, फडणवीसांच्या नादाला...; आमदाराचं टीकास्त्र

Nandkumar Joshi

Eknath Shinde Update News | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आता महिना पूर्ण झाला आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला असून, उद्या भाजप आणि शिंदे गटातील आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना सल्ला देऊ केला आहे.

जे चालवलंय ते बरे नाही शिंदे साहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, असं या आमदारानं ट्विट केले आहे.

शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी भाजपसोबत (BJP) राज्यात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांचे सरकार (Maharashtra Government) राज्यात येऊन आता महिना पूर्ण झाला आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. राज्य सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ बैठकाही झाल्या. त्यात अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र, यावरून आता विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शिंदे सरकारला ३५ दिवस पूर्ण झाले आहेत. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेटविना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलं आहे, ते बरं नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, असं अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: त्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा आरोप

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

SCROLL FOR NEXT