Maharashtra Political Crisis | Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! देवेंद्र फणडवीस राज्यपालांच्या भेटीला; बहुमत चाचणीची केली मागणी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय भाजपकडून (BJP) आता सत्तास्थापने बाबतच्या हालचालींना वेग आल्याच दिसतं आहे.

आज दिवसभर देवेंद्र फडणवीस (Devendra Fandavis) दिल्लीमध्ये होते. ते दुपारी मुंबईत आले आणि आता थेट राजभवनावर गेल्यामुळे भाजप आता सत्तासंघर्षामध्ये उघडपणे सामील झाल्याचं बोललं जात आहे. शिवाय भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांना बहुमत चाचणी बद्दलचे पत्र दिलं असून यासाठीच हे शिष्टमंडळ राजभवनात पोहचले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

एकीकडे भाजपने आता बहूमताची चाचणीची मागणी केली आहे तर आजच शिवसेनेकडून (Shivsena) फ्लोर टेस्ट सारख्या मागण्या जर विरोधकांकडून करण्यात आली तर आपण कोर्टात जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेना राज्यपालांच्या या निर्णयावरती काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT